प्रेयसी सोबत पळून जाण्यासाठी वयाच्या 65 व्या वर्षी केला खून

0
423

चऱ्होली, दि. २७ (पीसीबी) – प्रेयसी सोबत पळून जाण्यासाठी वयाच्या 65 व्या वर्षी त्याने स्वतःच्या खूनाचा बनाव करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचे शीर धडा वेगळे केले. तसेच स्वतःचे कपडे घालून मृतदेह पुन्हा रोटर मशीनमध्ये फिरवून मयत व्यक्ती स्वतः आहे असे भासवले. हा प्रकार चऱ्होली खूर्द येथे 16 डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजता घडला.

सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे (वय 65, रा.चऱ्होली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रविंद्र भिमाजी घेनंद (वय 48) असे मयत व्यक्तीचे नाव असून निखील रविंद्र घेनंद (वय 28 रा. धानोरे, खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीआहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याचे एक महिलेसोबत प्रेम संबंध होते. त्याल्या त्याच्या प्रियसी सोबत दूर कोठे तरी जाऊन रहायचे होते. यासाठी त्याला त्याच्याच मृत्यूचा बनाव बनवायचा होता. यासाठी त्याने महिलेसोबत मिळून रविंद्र घेनंद यांना विश्वासात घेऊन सुभाष ज्ञानोबा थोरवे यांच्या शेतात बोलावले. कोयत्याने त्यांचे मुंडके कापले, मृतदेहाच्या अंगावर स्वतःचे कपडे घातले. तसेच शेतात काम करायच्या रोटर मशीनमध्ये मृतदेह घालून तो फिरवला व अपघात असल्याचा बनाव केला. तसेच मृतदेहाचे मुंडके, कोयता व अंगावरचे कपडे लपवून ठेवत पुरावा नष्ठ करण्याचा प्रयत्न केला.