प्रेयसी बरोबर बोलतोय पाहून प्रियकराचा संताप, थेट चारचाकी अंगावर घातली

0
267

पिंपरी चिंचवड शहरात काल मध्य रात्री एकच्या सुमारास यशवंत नगर येथील शंकर चौधरी चौक परिसरात एका तरुणाने आपली प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचं पाहून मुलाच्या अंगावरती चार चाकी वाहन घालण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या घटनेमध्ये दुचाकीस्वार मुलगा जखमी झाला असून त्याच्यावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय सी एम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सुशील काळे असे अंगावर चारचाकी गाडी घालणाऱ्या तरुणाचे नाव असून या अपघातात निलेश शिंदे हा तरुण जखमी झाला आहे. आपली प्रेयसी निलेश शिंदे या तरुणासोबत बोलत थांबल्याचे पाहून राग अनावर झाल्याने सुशील काळेने आपली चार चाकी गाडी निलेश शिंदे यांच्या अंगावर घातली.

दरम्यान या प्रकरणावरून पिंपरी पोलिसांनी लागोला आरोपी सुशील काळे यांच्या विरोधात ३०७ अंतर्गत खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.