प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या

0
38

चाकण, दि. 27 (पीसीबी) : प्रेयसी आणि योगा टीचरने तरुणाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्रास दिला. हा प्रकार एक ऑगस्ट ते 18 ऑक्टोबर या कालावधीत श्रीराम नगर चाकण येथे घडला. या त्रासाला कंटाळून प्रियकराने आत्महत्या केली.

सूर्यकांत रामदयाल प्रजापती (वय 27, रा. चाकण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीकांत रामदयाल प्रजापती (वय 25) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक महिला आणि बापू सोनवणे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि फिर्यादी श्रीकांत यांचा भाऊ सूर्यकांत यांचे प्रेम संबंध होते. आरोपी महिला आणि योगा टीचर आरोपी बापू सोनवणे यांनी फिर्यादी सूर्यकांत याला लैंगिक अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. सूर्यकांत याला टेलिग्राम, व्हाट्सअप आणि गुगल पे वर शिवीगाळ करत अपमान केला. या त्रासाला कंटाळून सूर्यकांत याने 18 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.