प्रेयसीचा गळा दाबून खून

0
87

पुणे, दि . २४ ( पीसीबी ) : हडपसर परिसरात तरुणाने प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहराजवळ घडली. खून केल्यानंतर तरुण ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. अनिता लोंढे (२७) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून राहुल शिवाजी पिसाळ असं ३२ वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी राहुल पिसाळ हा यवत पोलीस ठाण्यात हजर झाला. मी माझ्या पत्नीचा खून करून आलोय, असं आरोपीने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडे पत्त्याबाबत विचारणा केली असता शेवाळवाडी येथील भंडलकरनगर इथं आपण वास्तव्यास असल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर यवत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ याबाबतची माहिती हडपसर पोलीस ठाण्यात दिली. हडपसर पोलिसांनी भंडलकरनगर इथं जाऊन तपासणी केली असताना अनिता लोंढे ही घरात मृतावस्थेत आढळून आली.