प्रेयसीचा खून करून मृतदेह आईच्या घरासमोर ठेवला; प्रियकर पसार

0
142

वाकड, दि. ११ (पीसीबी)

लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने खून केला. त्यानंतर प्रेयसीचा मृतदेह तिच्या आईच्या घरासमोर रिक्षामध्ये ठेऊन प्रियकर पळून गेला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. 11) सकाळी काळेवाडी स्मशानभूमी जवळ उघडकीस आला.

शिवानी सोमनाथ सुपेकर (वय 27, रा. जगताप नगर, थेरगाव) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित प्रियकर विनायक आवळे आणि शिवानी हे मागील दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. मंगळवारी त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या वादातून विनायक याने शिवानीचा मध्यरात्री गळा आवळून खून केला.

त्यानंतर त्याने शिवानीचा मृतदेह रिक्षात ठेवून रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर पार्क केली. बुधवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रिक्षा चालक संशयित प्रियकर विनायक पळून गेला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.