प्रेम संबंधाच्या कारणावरून मारहाण

0
99

पिंपरी,दि. 16 ऑगस्ट (पीसीबी)
प्रेम संबंधाच्या कारणाावरून एकास मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 15) सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास मिलिंदनगर, पिंपरी येथे घडली.

मनोज सुभाष टाक (वय 35, रा. रिव्हर रोड, पिंपरी) असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जस्सी सिद्धु (रा. डिलक्स चौक, पिंपरी) आणि एका 35 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि महिला आरोपी यांच्यात प्रेमसबंध होते. फिर्यादी यांना एकटे गाठून आरोपी जस्सी याने आरोपी तरुणीशी बोलायचे नाही, असे सांगत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी महिला आरोपीन हिने फिर्यादीला पकडून ठेवले व आरोपी जस्सी याने लाकडी बांबूने मारहाण करून फिर्यादी मनोज टाक यांना जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.