प्रेम विवाहानंतरही हुंड्यासाठी पत्‍नीचा छळ

0
72

पिंपरी, दि. ०१ (पीसीबी) : प्रेम विवाहानंतरही पत्‍नीचा हुंड्यासाठी छळ करण्‍यात आला. याप्रकरणी पतीच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना जानेवारी 2014 ते जून 2024 या कालावधीत एमआयडीसी चिंचवड येथे घडली.

अमोल सदाशिव जाधव (वय 38, रा. एम्‍ पायर स्‍वेअर सोसायटी, एमआयडीसी चिंचवड) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत 34 वर्षीय पत्‍नीने रविवारी (दि. 29) पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपीने वेळोवेळी फिर्यादी यांचा शाररीक व मानसिक छळ केला. फिर्यादी व त्‍यांच्‍या आई वडिल यांना वारंवार घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. फिर्यादी यांना जिवे मारण्‍याची धमकी दिली. आपल्‍याला घर घेण्‍यासाठी तुझ्या बापाकडून 50-60 लाख रुपये घेऊन ये, असे वारंवार म्‍हणत हुंड्याची मागणी केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.