प्रीपेड टास्क च्या बहाण्याने तरुणाला 39 लाखाचा गंडा

0
199

पिंपरी ,दि २७ (पीसीबी) – प्रीपेड टास्क करून जास्तीत जास्त पैसे मिळवण्याच्या अमिषातून तरुणाला 39 लाखाचा गंडा घालण्यात आला आहे हा प्रकार 27 एप्रिल ते 17 मे या कालावधीत पिंपळे सौदागर येथे ऑनलाइन पद्धतीने घडला.

याप्रकरणी साई संतोष व्यंकटरमना वुन्ना (वय 30 राहणार पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात सोमवारी(दि.26) फिर्याद दिली असून अनोळखी महिला मीना व टेलिग्राम आयडी वरील रमा या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांना व्हाट्सअप नंबर वर संपर्क साधत रमा हिने @Rama 1709, arm worldwide Mission Group टेलिग्राम ग्रुप मध्ये अड करत वेगवेगळे प्रीपेड टास्क देत बँक खात्यावरील रक्कम घेत मुद्दल व कोणताही परतावा न देता तब्बल 39 लाख 15 हजार 415 रुपयांची फसवणूक केली आहे. यावून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत