प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची होस्टेलमध्ये आत्महत्या

0
155

पुणे, दि. ५ (पीसीबी) – प्रियकर देत असलेल्या त्रासाला कंटाळून 25 वर्षीय तरुणीने कॉलेजच्या होस्टेल मधील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तीन ऑक्टोबर 2023 रोजी आयआयएमएस कॉलेजच्या मुलींच्या डेल्टा होस्टेलमध्ये घडली.

अश्वनी भारद्वाज (रा. बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 4 फेब्रुवारी) फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी हिचे तिच्या कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा आरोपी याच्यासोबत मागील तीन ते चार वर्षांपासून प्रेम संबंध होते. आरोपी तरुण फिर्यादी यांच्या मुलीला सोडून दुसऱ्या मुली सोबत फिरत होता. तिला तिच्या मैत्रिणींसमोर मारहाण करत होता. तिचा अपमान करत होता. मरून जा. मला काही फरक पडत नाही, असे म्हणत त्याने फिर्यादी यांच्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यातून फिर्यादी यांच्या मुलीने हॉस्टेलमधील खोलीत छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.