प्रा. नामदेवराव जाधव यांच्या हस्ते सनय छत्रपती शासन पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे पिंपरीत उद्घाटन

0
21

बेकारीमुक्त, कर्जमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जनतेला नविन पर्याय; प्रा नामदेवराव जाधव यांचे प्रतिपादन

पिंपरी, दि. 02 (पीसीबी) : बेकारीमुक्त, कर्जमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जनतेला नविन पर्याय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी केले.त्यांच्या हस्ते सनय छत्रपती शासन पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन (दि.२८) पि.डी.सी. बँकेच्या वर,डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या शेजारी पिंपरी येथे करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महासचिव पिउस पुल्लिकोत्तील,खजिनदार जगदीश पवार तसेच कार्यकर्ते, सदस्य आदी उपस्थित होते.

यावेळी जाधव म्हणाले की, महाराष्ट्राला बेकारीमुक्त, कर्जमुक्त करण्यासाठी नवीन कार्यक्रम पर्याय जनतेला मिळावा यासाठी सनय छत्रपती शासन हा राष्ट्रीय पक्ष म्हणून नोंदणीकृत केलेला आहे.शिवरायांच्या विचारांनी विद्यार्थी घडवणे, तरूणांच्या हातांना काम देणे, गडकोट स्वच्छता, संवर्धन पर्यटन या माध्यमातून ४० लाख उद्योजक घडवत हा महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर घेऊन जाणे या उद्दिष्टांच्या पुर्ततेसाठी शिवकार्य हेच राष्ट्रकार्य मानून सनय छत्रपती शासनची वाटचाल प्रारंभ करत आहोत. तेही शिवरायांची समाधी ज्यांनी शोधून काढली आणि शिवरायांच्या चरित्रावरील १००० ओळींचा पोवाडा ज्यांनी रचला त्या वैश्चिक समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केले आहे.

मध्यवर्ती कार्यालय पिंपरी चिंचवड शहरात असल्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे काम पक्ष करेल. हे शहर कामगारांची नगरी म्हणून ओळख असलेले शहर आहे.त्यामुळे कामगारावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. शहरात कोणत्याही ठिकाणी भ्रष्टाचार अन्याय, अत्याचार होत असेल तर कार्यालयात येऊन मदत मागावी त्यांना न्याय देण्याचे काम पक्ष करेल असे मतही जाधव यांनी व्यक्त केले.