प्रारुप मतदार यादीवर तब्बल 1 हजार 306 हरकती

0
314

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – प्रभागनिहाय प्रारुप मतदार आजपर्यंत तब्बल 1 हजार 306 हरकती आल्या आहेत. त्यामुळे या हरकती निकाली काढण्याचे महापालिका निवडणूक विभागासमोर मोठे आव्हान असणार आहे. स्थळ पाहणी करून हरकती निकाली काढण्यासाठी 125 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

महापालिका प्रशासनाने 23 जून रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. 31 मे 2022 अखेरपर्यंत विधानसभा मतदारयादीमध्ये नोंदी झालेल्या मतदारांची नावे घेतली आहेत. प्रारुप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती येत आहेत. भौगोलिक दृष्ट्या मतदारांची नाव योग्य प्रभागात आलेली नाहीत. वास्तव्यास एका प्रभागात आणि प्रत्यक्षात नाव दुस-या प्रभागात आल्याच्या हरकतींचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही जण वैयक्तीक हरकत नोंदवित आहेत. तर, माजी नगरसेवक, इच्छुक गठ्याने हरकती देत आहेत. दरम्यान, मतदार याद्या तयार करीत असतानाच राजकीय हस्तक्षेप झाल्याचा भाजपचा आरोप आहे. तर, मतदार याद्यांची विभागणी प्रभाग रचनेला अनुसरून झालेली नाही. नावे दुसऱ्या प्रभागांमध्ये चुकीच्या पद्धतीने जोडल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

प्रारुप याद्यावर मंगळवारी एकाचदिवशी 958, आज 348 हरकती आल्या आहेत. आजपर्यंत 1 हजार 306 हरकती आल्या आहेत. हरकती नोंदविण्यासाठी 1 जुलै 2022 पर्यंत मुदत होती. राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. नागिरकांना आता 3 जुलैपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. त्यामुळे पुढील 4 दिवसात मोठ्या संख्येने हरकती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरकती निकाली काढताना निवडणूक विभागाची दमछाक होणार आहे. हरकतीवर काम करण्यासाठी 125 कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. हरकतीबाबत जागेवर जाऊन पाहणी केली जात आहे.