प्राधिकरणातील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव सुरू करा

0
357

निगडी, दि. 24 (पीसीबी) – पिंपरी चिंचवड मनपाचा निगडी प्राधिकरण येथील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव आहे. हा तलाव यावर्षी उन्हाळा सुरू झाल्यानंतर दीड महिना उलटलेला तरी देखील महापालिका व क्रीडा विभागामार्फत खेळाडू व नागरिकांना पोहोण्यासाठी सुरू करण्यात आलेला नाही, आता तो निमियात सूरू करावा, अशी मागणी शैलजा बाबर यांनी केली आहे.

तलाव बंद असल्यामुळे परिसरातील खेळाडू, विद्यार्थी, जेष्ठ व नागरिकांची गैरसोय होती. इतर ठिकाणाच्या जलतरण तलावात पोहोण्यासाठी त्यांना जावे लागते.

पोहोण्यासाठी येणा-या विद्यार्थी, खेळाडू आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी एकावेळी पोहण्यासाठी जलतरण तलावात उतरणा-यांची संख्या निश्चित करावी. त्या मर्यादित संख्येत पोहोण्यासाठी सर्वांना प्रवेश द्यावा. तरी, मनपामार्फत आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करावा, अशी मागणी केली आहे.