निगडी, दि. 24 (प्रतिनिधी) निगडी प्राधिकरण मध्ये झालेल्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालकाने दोन तरुणांना धडक दिल्याची घटना सोमवारी (दि. 22) रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास घडली.
संकेत सुनील सातपुते (वय 22, रा. निगडी प्राधिकरण. मूळ रा. चंद्रपूर), मेधज पाटील अशी जखमींची नावे आहेत. संकेत यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच 22/आरके 9921) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संकेत आणि त्यांचा मित्र मेधज हे रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी त्यांना एका कारने धडक दिली. त्यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. निगडी पोलीस तपास करत आहेत.










































