लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे नुकतेच पार पडले आहे, अजून पाच टप्पे बाकी आहेत. या दरम्यान शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देखाना मोठं विधान केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही.
वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.
त्याचवेळी उद्धव ठाकरे आपल्याच विचारधारेचे आहेत. ते समविचार आहे, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटा काँग्रेसमध्ये विलीन होणार? या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.
शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलखातीमध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबत मोठं विधान केलं आहे. निवडणुकीनंतर बरेच प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी योग्य वाटत असेल तर ते विचारात घेऊ शकतात असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
हे त्यांच्याच पक्ष राष्ट्रवादीलाही लागू होते का, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, “काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचाराचे आहोत. सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय काही बोलणं योग्य नाही वैचारिकदृष्ट्या आम्ही त्यांच्या (काँग्रेस) जवळ आहोत. रणनीती किंवा पुढील पावले यावर कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल.









































