प्रस्तावित वीज दरवाढ विरोधत शुक्रवारी भोसरीत उद्योजकांचा मोर्चा

0
329

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – प्रस्तावित वाढीव वीज दराविरोधात उद्योजकांचा भव्य मोर्चा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी, 24 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महावितरण कार्यालय भोसरी एमआयडीसी पावर हाऊस या ठिकाणी करण्यात येणार आहे.

इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी आज प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले की, या मोर्चामध्ये इतरही औद्योगिक संघटना सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात वीज दरवाढीमुळे उद्योजक हैराण झाले आहेत. त्यात विजेचा लपंडावामुळे लाईट जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. येत्या काळामध्ये प्रस्तावित वीज दरामध्ये दर वाढ होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. सध्याचा वीजदर सुद्धा राज्यात मोठ्या प्रमाणात असून त्याचा उत्पादनावर खूप मोठा परिणाम होत असल्याचे उद्योजकांचे मत आहे. जर अशीच दरवळ राज्यात होत असेल तर राज्यातून कारखाने परराज्यात जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. सरकारने विजेची दरवाढ करू नये आणि आहे ते विजेत्या दरामध्येच कमी करावी, या मागणीसाठी महावितरण कार्यालयावर उद्योजक भव्य मोर्चा काढणार आहे.

या मोर्चामध्ये सर्व उद्योजकांनी आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा समाविष्ट होण्याचे आवाहन फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभय भोर यांनी केले आहे.