प्रस्तावित न्यायालय मंजूर होण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

0
287

पिंपरी दि,१५ (पीसीबी) – पिंपरी – चिंचवड शहरात जिल्हा आणि सत्र न्यायालय ३, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ३, तसेच मोटार वाहन न्यायालय व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ४ न्यायालये इत्यादी मंजूर होण्याबाबत पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवार, दिनांक १५ मे २०२३ रोजी निवेदन देण्यात आले.

निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, माजी अध्यक्ष ॲड. सतीश गोरडे, उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, सदस्य ॲड. नितीन पवार, ॲड. पवन गायकवाड, ॲड. अक्षय केदार, ॲड. सोहम यादव यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाचा स्वीकार केला. मोशी प्राधिकरण येथील न्यायालयाकरिता प्रस्तावित जागेचा निधी मंजूर झाला असून जुलै अखेर भूमिपूजन करण्याबाबत आश्वासन मा उपमुख्यमंत्री यांनी बार असोसिएशनला दिले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार महेशदादा लांडगे उपस्थित होते.