प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे निधन…! ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
632

मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं त्यांनी मराठी, हिंदी मनोरंजन विश्वावर वेगळी छाप उमटवली होती. सावरकर यांच्या निधनाच्या बातमीनं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन क्षेत्रातील विविध सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे.

त्यांनी शंभरहून मराठी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. ३० हून अधिक अधिक हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. जयंत सावरकर यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविले होते.