प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची तब्येत अचानक खालावली…

0
476

दिल्ली दि. १० (पीसीबी) : प्रसिद्ध कॉमेडियव राजू श्रीवास्तव यांचूी तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील एका जिममध्ये वर्कआउट करत असताना राजू श्रीवास्तव बेशुद्ध पडले. राजू यांच्या जवळच्या मित्राने सांगितले की, वर्कआउट दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, पण आता ते शुद्धीवर आले आहेत.

राजू श्रीवास्तव यांना काय झालं?
राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. जिममध्ये वर्कआऊट करताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. ही बातमी ऐकताच राजू यांचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध कॉमेडियन आहेत. ते उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्षही आहेत.

राजू श्रीवास्तव कॉमेडीचे बादशाह मानला जातात. राजू श्रीवास्तव यांना लहानपणापासूनच कॉमेडियन बनायचे होते आणि त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्णही केले. राजू यांनी आपल्या करिअरची सुरुवात स्टेज शोपासून केली. २००९ पर्यंत राजू श्रीवास्तव यांची लोकप्रियताही अधिक होती. त्यामूळे त्यांना ‘बिग बॉस’मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ‘बिग बॉसमध्ये भाग घेतला. तिथेही त्यांनी आपल्या अंदाजात रसिकांचे भरघोस मनोरंजन केले.