प्रवासी महिलेची अडीच तोळ्याची सोन्याची पाटली पळवली

0
533

निगडी, दि. १३ (पीसीबी) – पीएमपीएमएल बस मध्ये चढताना वृद्ध महिलेच्या हातातून अडीच तोळ्याची सोन्याची पाटली चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 11) दुपारी टिळक चौक, निगडी येथे घडली.

याप्रकरणी 63 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरुवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास टिळक चौक निगडी येथून दापोडी येथे जात होत्या. टिळक चौकातून पीएमपीएमएल बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या हातातील 25 ग्रॅम वजनाची 1 लाख रुपये किंमतीची सोन्याची पाटली चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.