भोसरी, दि. 1३ (पीसीबी) : बस मध्ये बसलेल्या प्रवासी महिलेचा मोबाईल फोन पळवणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पाठलाग करून पकडले. ही घटना गुरुवारी (दि. 12) दुपारी पावणे दोन वाजता सुमारास भोसरी पीएमटी बस स्टॉप वर घडली. राहुल बागल असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रवासी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला भोसरी येथून वडगाव शेरी येथे जाण्यासाठी बसने प्रवास करीत होत्या. भोसरी बस स्टॉप येथे बस मध्ये बसल्यानंतर त्यांच्या खिशातून एका चोरट्याने मोबाईल फोन काढून नेला. चोर पळून जात असताना स्थानिक नागरिक आणि रीक्षा चालकांनी चोराचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडून प्रवासी महिलेचा 7 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.