प्रवाशांनी सहकार्य करण्याचे बाबा कांबळे यांचे आवाहन

0
434

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – रिक्षा चालकांसाठी होऊ घातलेल्या मीटर भाडेवाडीचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले आहे. महागाई वाढल्यामुळे ही वाढ होणे गरजेचे होते. प्रवाशांनी देखील रिक्षा चालकांना सहकार्य करावे, असे आवाहन बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात केले आहे.

बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की,
रिक्षा मीटरमध्ये भाडेवाढ करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा संघटना, ग्राहक व प्रवासी संघटना यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
आता पहिल्या किलो मीटरसाठी २७ रूपये तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटर पाठीमागे १८ रूपये भाडेवाढ निश्चित करण्यात आली आहे. लवकरच आरटीओ कमिटी मध्ये हा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली.

सीएनजीच्या दरामध्ये व महागाईच्या दरामध्ये सतत वाढ होत आहे. यामुळे खटवा कमिटीच्या सूत्रानुसार ही भाडेवाढ देण्यात आली आहे.
या भाडेवाडीचे महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी स्वागत केले आहे. रिक्षा भाडेवाडीने नागरिकांच्या खिशाला कात्री बसेल याची जाण रिक्षा चालक मालकांना आहे. मात्र वाढत्या महागाईचा रिक्षा चालकांना किती फटका सहन करावा लागत आहे याचा देखील सहानुभूतीपूर्वक नागरिकांनी विचार करावा, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले आहे. विविध कर्जाचे डोंगर रिक्षा चालकांवर झाले आहेत. ते कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून रखडलेली भाडेवाढ होणे गरजेचे होते. नागरिकांनी देखील समजून घेऊन सहकार्य करावे असे, आवाहन बाबा कांबळे यांनी केले. तसेच रिक्षा चालकांनी ग्राहकांना योग्य सेवा देऊन गैरवर्तन करू न करण्याचे देखील आवाहन बाबा कांबळे यांनी केले.

रिक्षा चालक मालकांसाठी होऊ घातलेली रिक्षा मिटर भाडे वाढ ही ऐतिहासिक आहे. हे रिक्षा चालक मालकाने लक्षात घ्यावे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक मालकांसाठी आनंदाची बाब आहे.
भाडेवाढ मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या व आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या व सर्व रिक्षा चालक मालकांचे या वेळी आभार मानले.