पिंपरी, दि. ८ – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रथम उपमहापौर विश्राती रामभाऊ पाडळे (वय – ७६) यांचे आज दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या मूळ गावी कांजी भोयरे (ता.पारनेर,जि. अहिल्यानगर) येथे ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती रामभाऊ पाडळे, दोन मुले प्रशांत, प्रविण आणि कन्या अनिता विकास शिंदे असा परिवार आहे. उद्या म्हणजे बुधवारी (दि.९) सकाळी साडेअकराच्या सुमारास पिंपरी कँम्प येथील स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी कळविले आहे. महिला आरक्षण लागू केल्यानंतर महापालिकेत १९९२ मध्ये त्या उपमहापौर होत्या.