प्रतिभा आणि प्रतिमा असलेल्या महिलांनाच आप ची उमेदवारी

0
306

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – स्मार्ट सिटी च्या विकासामध्ये स्मार्ट नियोजन करण्यासाठी प्रतिभा आणि प्रतिमा असलेल्या महिलांना आम आदमी पार्टी संधी देणार असल्याचे पिंपरी चिंचवड आम आदमी पार्टी महिला संपर्क प्रमुख ज्योती शिंदे यांनी म्हटले आहे.

प्रसिध्दीपत्रात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश महिला विविध क्षेत्रांत कार्यरत राहून स्वतःची वेगळी प्रतिमा आणि प्रतिभा मिळवत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था,मनपाच्या निवडणुकात निवडून येण्याची आर्थिक क्षमता पाहून राजकीय पक्ष तिकिटे देतात. महिला नगरसेवक निवडून आल्या तरी मागील काही वर्षात त्यांचे पतीराज प्रॉक्सि म्हणून वार्डात कारभार चालवत होते.

पिंपरी चिंचवड शहरातील महिला उद्योग,आय टी, शिक्षण, क्रीडा, कला क्षेत्रात नावलौकिक मिळवत असल्या तरी आजच्या पुरूषप्रधान राजकिय संस्कृती मुळे
निवडणुका जिंकता येत नाही.

स्मार्ट सिटी च्या विकासामध्ये स्मार्ट नियोजन करण्यासाठी प्रतिभा आणि प्रतिमा असलेल्या महिलांना आम आदमी पार्टी संधी देणार. त्यामुळेच खऱ्या अर्थाने पंचायत राज व्यवस्था आणि लोकशाही समृद्ध होईल.