प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी लग्न करणार ?

0
8

मुंबई, दि.26 (पीसीबी): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसंच मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री राहिलेले सुशील कुमार शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तसंच काही वृत्तपत्रांमध्ये प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू होत्या. या चर्चा म्हणजे अफवा असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

सोशल मीडियावर राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांचे फोटो व्हायरल करून हे दोघं लग्न करणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, यावर सुशीलकुमार शिंदे यांना एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे?
‘ही चुकीची गोष्ट आहे. आम्हीही पेपरमध्ये वाचतो, अशा बातम्या का चालवल्या जातात माहिती नाही. माझी मुलगी प्रणिती शिंदे खासदार आहे. प्रणिती संसदेत राहुल गांधींची सहकारी आहे. हात मिळवला तर काय झालं? अशाप्रकारे बातम्या व्हायरल करणं चुकीचं आहे. त्या दोघांचं लग्नाचं रिलेशन नाही’, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.