दि. २४ (पीसीबी) : विश्वबंधुत्व दिवस आणि राज योगिनी दादी प्रकाशमणि जी यांच्या 18व्या पुण्यतिथी निमित्ताने आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय तर्फे निगडी प्राधिकरणात रक्तदान शिबिराचे संचालिका बीके संगीता दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सह आयुक्त (निवृत्त) चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते झाले. एकूण 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले .पीएसआय ब्लड बँक पिंपरी यांनी रक्त संकलनाची जबाबदारी घेतली.बीके नवनाथ साखरे , बीके सुभाष राणे यांनी नियोजन केले.