(पीसीबी) दि. २० : विश्वबंधुत्व दिवस आणि राज योगिनी दादी प्रकाशमणि जी यांच्या अठराव्या पुण्यतिथी निमित्ताने दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय तर्फे ओम शांती बिल्डिंग, सेक्टर 27 ए, निगडी प्राधिकरणात रक्तदान शिबिराचे सकाळी 8 ते 2 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. पीएसआय ब्लड बँक पिंपरी हे रक्त संकलनाची जबाबदारी घेणार आहेत.
संचालिका बीके संगीता दीदी यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान केले आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस प्रमाणपत्र दिले जाईल.
बीके स्वाती दीदी, बीके नेत्रा दीदी, बीके नवनाथ साखरे , बीके सुभाष राणे आणि बीके संदेश ,बीके मिलिंद जाधव यांचे नियोजन असेल. याच दिवशी भारत आणि नेपाळमधील ब्रह्माकुमारीज च्या 6500 सेंटर मध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या सर्व रक्तदात्याऺची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे.
सामाजिक भान जपत गरजू रुग्णांसाठी रक्त साठा उपलब्ध करून देणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.