प्रचार दौऱ्यात ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी श्रीवर्धन यांचाही सहभाग

0
47

कासारवाडी , दि. १० :- पिंपरी विधानसभेच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांनी आज कासारवाडी परिसरात काढलेल्या प्रचार फेरीत समाजाच्या सर्व घटकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले व यावेळी पिंपरी विधानसभेतून त्या नक्की विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. या प्रचार फेरीत प्रामुख्याने ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी श्रीवर्धन पिंपरी विधानसभेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यासह काँग्रेस शिवसेना व मित्र पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांच्या कासारवाडी परिसरातील प्रचार फेरीची सुरुवात शनी मंदिर येथून झाली यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक सोपानराव लोंढे तसेच माजी नगरसेवक चंद्रकांत लांडगे यांच्या निवासस्थानी सुलक्षणा शिलवंत यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

कासारवाडी दौऱ्यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार,लहू लांडगे, दिनेश लांडे, गजानन धावडे, मेहबूब इनामदार, विशाल मोटे, शिवाजी कुराडकर,चंद्रकांत शिंदे, सचिन ठोंबणे, शंकर कुराडकर, अनिल घोरपडे, किसन पाटील, सूर्यकांत घोडके, विराज घोडके, इत्यादी नेते उपस्थित होते.

या प्रचार फेरीत एस डी ए प्रेयर हॉल कासारवाडी येथे ख्रिस्ती बांधवांनी सुलक्षणा शिलवंत यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पास्टर अभय मोरे आणि जोसेफ खाजेकर उपस्थित होते. वर्धमान स्थानिक वासी जैन श्रावक संघ कासारवाडी येथीही जैन बांधवांनी सुलक्षण शिलवंत यांचे स्वागत केले. जैन शाळेचे प्रमुख व शहरातील नामवंत चार्टर्ड अकाउंटंट अशोककुमार पगारिया तसेच सामाजिक कार्यकर्ते आकाश लांडगे यांनी अनेक प्रतिष्ठित नागरिकांसह सुलक्षणा शिलवंत त्यांना शुभेच्छा दिल्या.

कासारवाडी प्रचार फेरीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अनेक लहान मुलांनी सुलक्षणा शिलवंत यांचे गुलाबाचे फुले देऊन स्वागत केले. कासारवाडी येथील जामा मस्जिद मध्ये सुलक्षणाशीलवंत यांचे स्वागत करण्यात आले व मौलवींनी त्यांना आशीर्वाद दिले.

या प्रचार फेरीत काँग्रेसचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी श्रीवर्धन लोणावळ्याचे नगरसेवक विश्वेश्वर आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आदी नेते उपस्थित होते.