प्रचंड हॉट असल्याने महिला स्विमरला पॅरिस ऑलिम्पिकमधून घरी जावं लागलं

0
200

दि.8 ऑगस्ट (पीसीबी) – सध्या पॅरिस ऑलिम्पिकची जोरदार चर्चा आहे. रोज ऑलिम्पिकमध्ये काही ना काही घडत असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. ऑलिम्पिकच्या एका नियमामुळे अवघे 50 ग्रॅम वजन अधिक भरल्याने भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. केवळ दिसायला प्रचंड सुदंर असल्याने म्हणजेच प्रचंड हॉट असल्याने एका महिला स्विमरला पॅरिस ऑलिम्पिकमधून घरी जावं लागलं आहे.

जिच्याबाबत हा प्रसंग घडलाय तिचं नाव लुआना अलोंसो (Luana Alonso) असं आहे. ती 20 वर्षाची असून पराग्वेची राहणारी आहे. ती स्विमर आहे. तिला ऑलिम्पिक व्हिलेजमधील रुम खाली करण्यास सांगितलं आहे. एवढंच नव्हे तर तिला परत घरी पाठवलं आहे. ज्या कारणासाठी तिला घरी जाण्यास सांगितलं ते अत्यंत हैराण करणारं आहे. ते ऐकल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. अन् आश्चर्य वाटेल.

एका वृत्तानुसार, लुआना अलोंसो ही अत्यंत सुंदर असल्याने तिला पराग्वेला पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. एथिलीटने वरिष्ठांकडे तिची तक्रार केली होती. तिच्या सौंदर्यामुळे एथिलिटची एकाग्रता भंग होत होती. तशी तक्रारच या खेळाडूंनी केली. त्यामुळे तिला घर सोडण्यास सांगितलं. लुआनाचं या ठिकाणी राहणं योग्य नसल्याचं अधिकाऱ्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी तिला तिथून जाण्यास सांगितलं. अधिकाऱ्यांनी फर्मान सोडल्यानंतर लुआना तिथून निघून गेली. पण आता सोशल मीडियावर तिच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

लुआना अलोंसोने पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या दरम्यान संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे तिचं करिअर आता कुठे सुरू झालं होतं. असं असातना तिने मध्येच संन्यास घेण्याची घोषणा केली. फायनलमध्ये पोहोचण्याआधीच तिला पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे तिने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात होतं.