प्रचंड युवाशक्ती…सामर्थ्यशाली राष्ट्रवादी..!

0
155

बालेवाडी, दि. १२ (पीसीबी) – राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज बालेवाडी क्रिडा संकूल (स्टेडिअम) येथे भव्य राज्यस्तरीय युवक मेळावा झाला.

राज्याचे नेते तथा उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुनीलजी तटकरे, कॅबिनेट मंत्री श्री. धनंजय मुंडे आणि मान्यवरांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले.

युवा नेते श्री. पार्थदादा पवार, आमदार श्री. सुनीलआण्णा शेळके, युवक प्रदेशाध्यक्ष श्री. सूरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दुचाकी रॅली काढून आम्ही कार्यक्रमस्थळी रवाना झालो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राहिलेला सुरुवात करण्यात आली.

प्रचंड उत्साह आणि मान्यवर नेत्यांच्या मार्गदर्शनाने युवकांचा हा मेळावा संस्मरणीय ठरला. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.