प्रगत तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सुखकर होईल – अजय देशपांडे

0
28

पीसीसीओई मध्ये उद्योग ४.० साठी प्रगत संगणक कार्यशाळा संपन्न

पिंपरी,दि. ६ – चॅटजीपीटी, टेस्ला ऑटोपायलट यासारख्या प्रगत तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सुखकर होईल. यामुळे कमी खर्चात दळणवळण, संपर्क वेगाने होईल. याचा सकारात्मक परिणाम उत्पादन व सेवा क्षेत्रावर प्रकर्षाने होईल आणि भारताची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल अधिक जोमाने होईल. यासाठी आपण डिस्ट्रीब्युटेड डीप लर्निंग समजून घेऊन कायम अपडेट राहिले पाहिजे असे इन्सर्टिस सोल्युशन्स कंपनीचे अधिकारी अजय देशपांडे यांनी उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय येथे ‘एआयसीटीई – वाणी’
( AICTE – VAANI – व्हायब्रंट ॲडव्होकेसी फॉर ॲडव्हान्समेंट अँड न्युचरिंग ऑफ इंडियन लँग्वेजेस) यांच्या सहयोगाने “उद्योग ४.० साठी प्रगत संगणक” या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी देशपांडे बोलत होते. उद्घाटन पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांच्या हस्ते झाले. यावेळी संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. अनुराधा ठाकरे, डॉ. प्रा. स्वाती शिंदे, सहा. प्रा. डॉ. सांत्वना गुडधे, पूजा पोहकर आदी उपस्थित होते. सीडॅक च्या तज्ज्ञांनी पॅरलेल प्रोग्रॅमिंग मॉडेल्स फॉर एआय चे प्रात्यक्षिक सादर केले.
इन्फोसिसचे हेमंत सेलमोकार यांनी ‘हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग (एचपीसी),’ आयए डेटा ॲनालिटिक्स प्रा. लि. चे प्रमुख श्रीकांत कोकाटे यांनी ‘बिग डेटाचे कार्यक्षम व्यवस्थापन’ टीसीएस रिसर्चचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सचिन पवार यांनी ‘लार्ज लँग्वेज मॉडेल्स (एलएलएम्स) च्या आरोग्यसेवा, वित्त आणि उत्पादन क्षेत्रातील उपयुक्तता’ आणि डॉ. स्वाती शिंदे यांनी ‘एज कम्प्युटिंगची व्यावहारिक उपयुक्तता’ आणि डॉ. अनुराधा ठाकरे यांनी ‘इंटेलिजंट कम्प्युटिंग व मल्टी-ऑब्जेक्टिव्ह ऑप्टिमायझेशन’ या विषयावर मार्गदर्शन केले.
समारोप सत्रात आयआयआयटी पुणेचे डॉ. भूपेंद्र सिंह यांनी ‘सायबर सुरक्षा क्षेत्रात एआयची दुहेरी भूमिका’ याविषयी मार्गदर्शन केले.
नागपूर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय निवृत्त प्रा. डॉ. अशोक मातनी यांनी ‘क्वांटम कम्प्युटिंग मधील सिद्धांत, अल्गोरिदम, क्रिप्टोग्राफी व औद्योगिक अनुप्रयोग’ या विषयावर आणि ‘ॲडेसो इंडिया’च्या प्रियांका शेटे यांनी ‘एआयच्या सहाय्याने नेक्स्ट जनरेशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचा आढावा मुस्कान ठाकुर यांनी सादर केला. सूत्रसंचालन कोशदा भट यांनी आणि डॉ. सांत्वना गुडधे यांनी आभार मानले.
ही कार्यशाळा एआयसीटीई च्या सहयोगाने आणि पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तसेच पीसीयू चे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.