प्रख्यात फिजिशीयन डॉ.अजित यादव यांचे निधन

0
68

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरातील प्रख्यात फिजिशीयन डॉ. अजित यादव यांचे (वय- ७३) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी महापालिकेतील निवृत्त जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.कमल यादव, सुप्रसिध्द अभिनेत्री प्रियांका आणि शशांका अशा दोन कन्या, जावई असा परिवार आहे.

डॉ.यादव हे पिंपरी चिंचवड आयएमए चे विश्वस्थ होते. चिंचवड स्टेशन येथील निरामय हॉस्पिटलचे संस्थापक संचालक म्हणून अखेर पर्यंत कार्यरत होते. तब्बल ४२ वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अत्यंत अचूक निदान करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती. वैद्यकीय पेशातही सामाजिक भान जपणारे सामान्य जनांचे डॉक्टर असा त्यांचा सर्वदूर परिचय होता. लोकपाल विधेयकासाठी देशातील भ्रष्टाचार विरोधात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे आंदोलन छेडले होते त्यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील आंदोलनात डॉ. यादव यांचा उत्स्फुर्त सहभाग होता. शहरातील बहुसंख्य मान्यवरांनी त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली.