प्रख्यात ज्योतिष विजय पटवर्धन यांचे निधन

0
195

पुणे, दि. २८ (पीसीबी) – प्रख्यात हस्तसामुद्रिक ज्योतिष विजय पटवर्धन यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. आजवर तब्बल ८० हजारांवर हात पाहिले आणि प्रत्येकाचे अचूक भविष्य सांगितले. ज्यांचे ज्यांचे भविष्य सांगितले त्यांच्या अनुभवांवर आधारित वेध अज्ञाताचा हे पुस्तक त्यांनी लिहीले.
मानसाचे मन समजून घेणे आणि त्यांच्या नशिबाचा अभ्यास करणे ही त्यांची विशेष आवड होती. भविष्यरंजन नाही तर भविष्यकथन असते. हे एक शास्त्र आहे, ती एक विद्या आहे आणि विद्या नेहमी सत्याच्या पायावरच फलद्रूप होते, असे ते कायम सांगत.