प्रकाश आंबडेकरांच्या विरोधात राजरत्न आंबेडकर; जरांगेसोबत विधानसभा लढणार

0
78

मुंबई, दि. 26 (पीसीबी) : निवडणुकीपूर्वी मोठ्या उलथापालथी होत आहेत. बाप-लेक, काका पुतणी, काका-पुतण्या अशा लढती होत आहे. आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातून दोन वेगळे विचार समोर येत आहे. बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राजकारणात आहे. आता त्यांचे चुलते अन् पुतणे असलेले राजरत्न आंबेडकर विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहे. त्यासाठी त्यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी युती केली आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी राजरत्न आंबेडकर यांनी राज्यातील 29 राखीव जागा लढवण्याबाबत चर्चा झाली. ते स्वत:ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आपण कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार हे येत्या दोन ते तीन दिवसात ठरणार आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सख्ये बंधू आनंदराज आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर आहे. ते अशोक आंबडेकर यांचे पुत्र आहे. राजरत्न यांनी उच्चशिक्षण घेतले आहे. वित्तीय व्यवस्थापनात त्यांनी पीएचडी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे ते चुलते अन् पुतणे आहेत. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून राजरत्न आंबेडकर सामाजिक कार्यरत कार्यरत होते. नुकतीच त्यांनी आरपीआय पक्षाची स्थापना केली असून राजकारणात सक्रिय झाले आहेत. दोन वर्षांपासून उत्तर प्रदेश बहुजन मैत्री संमेलनातून ते दलितांना एकत्र करण्याचे प्रयत्न करत आहेत.

30 सप्टेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली होती. हाच पक्ष राजरत्न आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत केला आहे. राजरत्न आंबेडकर यांची संभाजीराजे यांच्याशी जवळकी आहे. राज्यात तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.