पुणे, दि. २४ –
पुणे जिल्ह्यातील पौड जवळ असलेल्या कोंढवळे गावात एक हेलीकॉप्टर पडल्याची घटना समोर आली आहे. हे हेलीकॉप्टर मुंबईवरुन विजयवाडा येथे निघाले होते. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व पौड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या हलिकॉप्टरमध्ये कॅप्टन आनंद हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, दीर भाटीया, अमरदीप सिंह, एस. पी. राम हे देखील जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे हेलिकॉप्टर जुहू मुंबई येथून हैदराबादला निघाले होते. ग्लोबल हेक्ट्रा कंपनीच्या मालकीचे हे हेलीकॉप्टर आहे.










































