पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न, तिघांवर गुन्हा दाखल

0
100

दिघी, दि.५ (पीसीबी)

पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत एका कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी तिघा विरोधात दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.4) सायंकाळी सहा ते साडेसात या कालावधीत दिघी पोलीस स्टेशन समोर घडला.

याप्रकरणी पोलिस अंमलदार सुधीर डोळस यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी कंठाराम दामोदर (वय 52) , आशिष कंठाराम दामोदर (वय 20) व महिला दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी टेम्पो व दुचाकी आडवी लावून पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व पोलिसांना अटकाव केला. पोलिसांनी गाड्यांचे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी शिवीगाळ करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्याकडील पेट्रोल स्वतःच्या व पोलिसांच्या अंगावर टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावरून पोलिसांनी कुटुंबातील तिघाही विरोधात गुन्हा दाखल केला असून दिघी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.