पोलीस ठाण्यातच पोलिसांना मारहाण

0
524

रावेत, दि. ३० (पीसीबी) – कामावरून काढून टाकल्याच्या रागातून सुरु असलेल्या भांडणातील आरोपीला पोलीस ठाण्यात आणले असता त्याने पोलीस ठाण्यात दंगा करून थेट पोलिसांनाच मारहाण केली. ही घटना रावेत पोलीस ठाण्यात घडली आहे.विजय तुळशीदास शिरसट (वय 32, रा. चिंचवडगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक फैयाज अब्दुलरशिद मुल्ला यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गुरुवारी रात्री ते शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत रावेत बिट मार्शल ड्युटीवर होते. त्यांना पुनावळे येथून एक कॉल आला. एक व्यक्ती दारू पिऊन ऑफिसमध्ये शिरून मारहाण करत असल्याची वर्दी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुनावळे येथे घटनास्थळी धाव घेतली. आरोही विजय हा त्याला कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून मालकाला मारहाण करत होता. पोलिसांनी त्याला अडवून पोलीस ठाण्यात आणले.

त्यावर माझा बाप पोलीस आहे. माझ्या मोठमोठ्या ओळखी आहेत. तुमची नोकरी घालवतो, असे म्हणून पोलिसांना शिवीगाळ केली. हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी नेले असता त्याने तिथेही डॉक्टरांशी हुज्जत घालून मेडिकल करण्यास नकार दिला. त्यांनतर त्याला रावेत पोलीस ठाण्यात आणले असता त्याने पोलीस ठाण्यात दंगा करून सीसीटीएनएस रूममधील मॉनिटर उचलून पोलिसांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर आरोपीने एका पोलीस कर्मचा-याची वर्दी फाडून शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.