पोलीस असल्याचे सांगत व्यावसायिकाचे अपहरण

0
422

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – पोलीस असल्याचे सांगत तिघांनी एका व्यावसायिकाला जबरदस्तीने गाडी बसवून त्यांचे भोसरीतून अपहरण केले. व्यावसायिकाकडे पाच लाख रुपयांची मागणी करत मारहाण करून औंध येथे सोडले. हा प्रकार गुरुवारी (दि. 18) रात्री साडे आठच्या सुमारास घडला.

नितीन शंकर धिमधिमे (वय 41, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मी भोसरी पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव आहे. मला तुझे घर बघायचे आहे. तू माझ्या गाडीत बस, असे सांगून एका आरोपीने फिर्यादी धिमधिमे यांना जबरदस्तीने गाडीत (एमएच 14/जेए 7108) बसवले. गाडीमध्ये दोन आणखी इसम बसले होते. ते दोघेही पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी फिर्यादीला हाताने मारहाण करत पाच लाख रुपयांची मागणी केली. आरोपींनी फिर्यादीचे अपहरण केले आणि त्यांना औंध येथील परिहार चौकात सोडून निघून गेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.