पोलीस असल्याचे सांगत भंगार गोळा करणाऱ्यास लुटले

0
104

चिखली, दि. ०३ (पीसीबी)

भंगार जमा करणाऱ्या एका व्यक्तीला अनोळखी दोन व्यक्तींनी पोलीस असल्याची बतावणी करून लुटले. व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून त्याचा गुगल पे चा पासवर्ड घेऊन 51 हजार दोनशे रुपये ट्रान्सफर केले. ही घटना दहा सप्टेंबर रोजी जाधववाडी चिखली येथे घडली.

रामसेवक तिहुल सहानी (वय 24, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भंगार जमा करण्याचे काम करतात. 10 सप्टेंबर रोजी ते द्वारका नगरी सोसायटी जवळ भंगार जमा करत होते. ते सोसायटी समोरील फुटपाथवर बसले असता दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती तिथे आले. त्या व्यक्तींनी ते पोलीस असल्याचे फिर्यादीस सांगितले. त्यानंतर त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांचा गुगल पेचा पासवर्ड मागितला. फिर्यादी यांनी पासवर्ड देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्यांना कोयत्याने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीने गुगल पे चा पासवर्ड दिला असता आरोपींनी त्यांच्या खात्यावरून 51 हजार दोनशे रुपये वेगवेगळ्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.