पोलीस असल्याची बतावणी करून पावणेदोन लाखांची फसवणूक

0
99

रावेत, दि. 08 (पीसीबी)

पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी एका वृद्धाकडील सुमारे पावडे दोन लाखांचे दागिने पळवून नेले. ही घटना सोमवारी (दि. 7) सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास वाल्हेकरवाडी रोडवर रावेत येथे घडली.

याप्रकरणी 76 वर्षीय व्यक्तीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी फिर्यादी यांना ते पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर हात चलाखी करून फिर्यादी यांच्याकडील एक लाख 71 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आरोपींनी स्वतःकडे घेतले. त्यानंतर फिर्यादी यांची फसवणूक करून आरोपी भरधाव वेगात दुचाकीवरून निघून गेले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.