पोलीस असल्याची बतावणी करत ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण करून खून, दोघांना अटक

0
849

तळेगाव दाभाडे , दि. १ (पीसीबी) – पोलीस अशल्याचे सांगून एका 65 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून बेल्टने मारहाण करत त्यांचा खून करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.31) तळेगाव दाभाडे , चिंचवड व टाकवे या परिसरात घडला. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा खून आर्थीक कारणावरून झाला आहे, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.

श्रीकृष्ण उद्धवराव टकले (वय 65) असे मयत नागरिकाचे नाव असून शिवाजी राजाराम गरूड (वय 65 रा. टाकवे) व अनिल शिवलिंग कोळी (वय 45 रा. तळेगाव दाभाडे) असे अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात किरण शंकर खोल्लम (वय 48 रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत टकले हे फिर्यादी यांचे सासरे आहेत. टकले हे फिर्यादीच्या घरीबसले असताना आरोपी थेट घरात घुसले व त्यांनी पोलीस असल्याची बतावणी केली, टकले यांना बळजबरी गाडीत बसवून चिंचवड येथे आरोपी शिवाजी याच्या मुलीच्या घरी नेले. तिथे ही पैशांच्या कारणावरून बेल्टने मारहाण करण्यात आली. पुढे त्यांना गाडीत बसवून टाकवे येथे नेले व तेथे ही पुन्हा मारहाण करून त्यांचा खून केला.तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.