पोलिसात तक्रार केल्यास सोडणार नाही

0
409

कामावर घेतले नाही म्हणून टोळक्याची दुकानात घुसून दहशत

काळेवाडी, दि. १७ (पीसीबी) – कामावर घेतले नसल्याच्या रागातून पाच जणांच्या टोळक्याने कपड्याच्या दुकानात घुसून व्यापाऱ्यास धमकी दिली. पोलिसात तक्रार केल्यास सोडणार नाही, असा दम देत टोळक्याने परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना पिंपरी येथील जयबाबा मार्केट मध्ये शनिवारी (दि. १४) घडली.

नारायण गोपीचंद चावला (वय ४७, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवम यादव (वय २०, रा. पिंपरी) व त्याचे पाच साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नारायण यांचे जयबाबा मार्केट मध्ये कपड्याचे दुकान आहे. त्यांनी आरोपी शिवम याला कामावर घेतले नाही. या रागातून शिवम हा त्याच्या साथीदारांसह हातात सिमेंटचे गट्टू घेऊन नारायण यांच्या दुकानात घुसला. आरोपींनी नारायण यांना शिवीगाळ केली. तसेच पोलिसात तक्रार केल्यास सोडणार नाही. अशी धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.