पोलिसात तक्रार केली तर घरात घुसून मारीन

0
486

आळंदी, दि. ९ (पीसीबी) – लग्न समारंभात काढलेल्या व्हिडीओ वरून दोन अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली. त्यानंतर ‘पोलिसात तक्रार केली तर घरात घुसून मारीन’ अशी धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 8) सकाळी आठ वाजता संतोषीमाता मंदिर, आळंदी येथे घडली.

चैतन्य लक्ष्मण पांचाळ (वय १७, रा. केळगाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या आईला संतोषी माता मंदिर आळंदी येथे सोडून घरी परत जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवले. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांनी एका लग्नात व्हिडीओ काढला होता. तो व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना लोखंडी पट्टीने मारहाण केली. शिवीगाळ करून ‘तू पोलिसात केस केल्यास तुला घरात घुसून मारिन’ अशी आरोपींची धमकी दिली आणि दुचाकीवरून आरोपी पळून गेले असे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.