पोलिसांसमोर दोन गटात हाणामारी, पाच जणांवर गुन्हा

0
683

तळेगाव दाभाडे, दि. २८ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील माळवाडी येथे पोलिसांसमोर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवारी (दि. २६) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.

सोमनाथ आनंदा शिंदे (वय ५१, रा. तळेगाव स्टेशन), विशाल बाळू पारधे (वय २२, रा. तळेगाव दाभाडे), नितीन पांडुरंग धोतरे (वय ३९, रा. तळेगाव दाभाडे), विकास जिजाबा येवले (वय ३१), सागर तानाजी दिवसे (वय ३२, दोघे रा. कान्हेवाडी, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रशांत सोरटे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अज्ञात कारणावरून एकमेकांसोबत भांडण करत होते. दरम्यान फिर्यादी पोलीस शिपाई प्रशांत सोरटे हे घटनास्थळी गेले असता आरोपींनी पोलिसांसमोर एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत सार्वजनिक शांततेचा भंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.