पोलिसांनी सापळा रचून “एवढ्या” लाखांचा मुद्देमाल केला जप्त

0
103

भोसरी, दि. १८ (पीसीबी) : – मेफेड्रॉन (एमडी) आणि चरस हे अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने भोसरी मधून अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 16) दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास बनाचावडा ते चक्रपाणी वसाहतकडे जाणाऱ्या रस्त्यावर भोसरी येथे करण्यात आली.
जहीर कदिर खान (वय 26, रा. कोंढवा खुर्द, पुणे. मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार महादेव जावळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनाचावडा ते चक्रपाणी वसाहतकडे जाणाऱ्या रस्त्यावर भोसरी येथे एकजण एमडी आणि चरस हे अंमली पदार्थ विक्रीसाठी आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून जहीर खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख 58 हजार 250 रुपये किमतीचे 13.440 मिलीग्रॅम एमडी आणि 9.540 मिली ग्रॅम वजनाचे चरस हे अंमली पदार्थ, एक कार असा एकूण 4 लाख 9 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.