पोलिसांनी सापळा रचला; पिस्‍तुलासह करेक्ट कार्यक्रम केला..

0
159

पिंपरी, दि. ०३ (पीसीबी) : पिस्‍तुलासह तरुणास पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी (दि. २) सायंकाळी जुनी सांगवी येथील गणपती विसर्जन घाटावर घडली.

अनिकेत ऊर्फ सोन्‍या अशोक बाराथे (वय २४, रा. शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्या मागे, बाराथे वस्‍ती, दापोडी) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक प्रवीण दौलत पाटील (वय ३५) यांनी सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, जुनी सांगवी येथे एकजण येणार असून त्‍याच्‍याकडे पिस्‍तुल असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी सापळा लावून पोलिसांनी अनिकेत याला ताब्‍यात घेतले. त्‍याची झडती घेतली असता त्‍याच्‍याकडे २५ हजार ५०० रुपयांचे एक देशी पिस्‍तुल व एक जिवंत काडतूस असा ऐवज जप्‍त केला. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.