पोलिसांच्या ताब्यातील आरोपी पसार, देहूरोड पोलिसांचा हलगर्जीपणा

0
192

मुंबईहून रेल्वेने पुण्याकडे येत असताना आरोपी रेल्वेतून उडी मारून पसार झाल्याची घटना देहूरोड परिसरात घडली. विशाल हर्षद शर्मा असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल शर्मा हा एका गुन्ह्यातील आरोपी असून तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. १३ मे रोजी गुरुग्राम येथील न्यायालयात हजर करण्यासाठी विशालला नेण्यात आले होते. १५ मे रोजी आरोपीला मुंबईहून रेल्वेने पुणे पोलीस त्याला घेऊन येत होते. त्याने बेडीसह देहूरोड परिसरात धावत्या रेल्वेतून उडी मारली याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.