पोलिसांचा बर्थडे होणार

0
43

वाढदिवसाला सुट्टी देण्याबाबत पोलीस आयुक्तांचे आदेश
-पूर्वसंध्येला पोलीस ठाण्यात होणार वाढदिवस साजरा

पिंपरी दि. 06 (पीसीबी) : कधी बंदोबस्त, कधी नैसर्गिक आपत्ती, सणोत्सव, व्हीआयपी दौरा, अपघात, राजकीय कार्यक्रम, निवडणुका, नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि गुन्हेगारी यासह शहरातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस दल कायम तत्पर असते. मात्र, कामाचा ताण, शारीरिक मानसिक थकवा आणि वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत असताना सुरु असलेली तारेवरची कसरत यामध्ये खाकीतल्या त्या माणसाला स्वतःकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही.

त्यातच महत्वाच्या सणोत्सवासह वाढीदिवसासारख्या महत्वाच्या दिवशी पोलिसांना घर आणि परीवाराला वेळ देता येत नसल्याने नेहमीच कौटुंबिक नाराजी पत्करावी लागते. मात्र आता पिंपरी चिंचवड पोलिसांना त्यांच्या वाढदिवसाला हक्काची सुट्टी मिळणार आहे. इतकेच नाही तर वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. याबाबत थेट पोलीस आयुक्तांनी आदेश दिल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बर्थडे हॅप्पी होणार आहे.