पोप फ्रान्सिस यांना पालिकेत श्रद्धांजली

0
4

पिंपरी, दि. २२ : थोर धर्मगुरू पोप फ्रान्सिस, महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती ज्ञानेश्वर भालेराव व महापालिकेचे निवृत्त सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांचे नुकतेच निधन झाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करून स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली.

मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात आयोजित स्थायी समिती सभेत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.थोर धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाल्याने राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. माजी स्थायी समिती सभापती ज्ञानेश्वर भालेराव तसेच निवृत्त सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांनी देखील त्यांच्या कार्यकाळात शहरवासीयांना सेवा दिली आहे.