पोटनिवडणुका बिनविरोध होतील हे डोक्यातून काढा – अजित पवार

0
308

पुणे, दि. ५ (पीसीबी) – पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना फोन केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पोटनिवडणुका बिनविरोध होतील हे आता त्यांनी डोक्यातून काढावे, असे अजितदादा पवार स्पष्ट म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, आताच्या पाच विधान परिषदेत मोठा झटका बसला आहे. सत्ताधाऱ्यांनी कितीही आव आणला तरी येत्या काही दिवसात महाविकास आघाडीचा प्रभाव दिसून येईल हे त्यांनाही माहिती आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही त्यांना झटका बसण्याची भावना त्यांच्या मनामध्ये आली आहे. निवडणूक म्हंटली की कोणाचा तरी विजय होतो, कोणाचा तरी पराभव होतो. अपयशाने खचायाचं पण नसतं आणि यशाने हुरळून पण जायचं नसत असंही अजित पवार म्हणाले आहेत.

कसबा पोटनिवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, कसबा चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हंटलं आहे. ते म्हणाले की कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचं काही कारण नाही. भाजपने कोल्हापूर, आणि पंढरपूरची पोटनिवडणूक बिनविरोध केली नाही. त्याचबरोबर देगलूरची निवडणुकही बिनविरोध झाली नाही. एक मुंबईची निवडणूक बिनविरोध झाली. बाकीच्या पोटनिवडणुका बिनविरोध होतील हे त्यांनी डोक्यातून काढाव. शेवटी लोकशाही आहे. जनतेला हवं त्याला ते निवडून देतील. असं अजित पवार म्हणाले आहेत.

मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेदवार अजून ही निश्चित झाले नाहीत. महाविकास आघाडीकडून चिंचवड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र या जागेवर अजून ही शिवसेना आग्रही आहे. मविआच्या चर्चेनंतर कसब्याची जागा काँग्रेस लढणार हे जाहीर झालं आहे. मात्र काँग्रेसने अजून पर्यंत उमेदवार जाहीर केला नाही. मात्र आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्याच्या काँग्रेस भवनात एक बैठक बोलावली आहे