पोटच्या मुलीस मारहाण करून रस्त्यावर सोडले

0
95

रावेत, दि. 16 (प्रतिनिधी)
पोटच्या साडेचार वर्षीय मुलीस अमानुष मारहाण करून तिला रस्त्यावर सोडून दिले. ही घटना मंगळवारी (दि. 13) दुपारी तीन वाजताच्या सुमारास म्हस्के वस्ती, रावेत येथे घडली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार नामदेव रामनाथ सालकर यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलीची 24 वर्षीय आई आणि पंचमकुमार छंगुरी मंडल (वय 26, रा. बांबोली फाटा, चाकण, ता. खेड, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पंचमकुमार याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पती पत्नी आहेत. महिला आरोपी हिला पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीपासून सुटका व्हावी, यासाठी तिने आणि आरोपी पंचमकुमार याने तिला मारहाण केली. साडेचार वर्षांच्या पोटच्या मुलीला रावेत येथील म्हस्के वस्ती परिसरात रस्त्यावर सोडून दिले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.